Dec. 17, 2024, 2:09 p.m.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि महाविद्यालय, विळद घाट, अहिल्यानगरच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थी ग्रामीण कृषी जागरूकता व आद्योगिक कार्यक्रम २०२४-२०२५ अंतर्गत नगर तालुक्यातील पारगाव येथे आगमन झाले.
Dec. 17, 2024, 2:07 p.m.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीशी संलग्न असलेल्या डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषिदूतांचे सोनेवाडी येथे आगमन झाले असता, त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले . ग्रामीण कृषी जागरूकता आणि ओद्योगिक कार्यक्रम कार्यक्रमांतर्गत हे कृषिदूत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
Dec. 16, 2024, 3:09 p.m.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि महाविद्यालय, विळद घाट, अहिल्यानगरच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थी ग्रामीण कृषी जागरूकता व आद्योगिक कार्यक्रम २०२४-२०२५ अंतर्गत नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे आगमन झाले त्यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले.
Dec. 16, 2024, 2:56 p.m.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि महाविद्यालयाचे चतुर्थ वर्षातील विद्यार्थी कृषिदूतांचे मेहकरी येथे आगमन झाले. ग्रामीण कृषि जागरूकता आणि ओद्योगिक कार्यक्रम २०२४-२५ हे कृषिदूत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
Dec. 16, 2024, 2:54 p.m.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि महाविद्यालय, विळद घाट, अहिल्यानगरच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनी ग्रामीण कृषी जागरूकता व आद्योगिक कार्यक्रमांतर्गत नगर तालुक्यातील पारेवाडीत दाखल झाल्या. सदर कार्यक्रमांतर्गत या कृषीकन्या कृषी वर आधारित व्यवसाय किंवा उद्योगामध्ये प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव घेणार आहेत.
Dec. 14, 2024, 9:35 a.m.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि महाविद्यालयाचे चतुर्थ वर्षातील विद्यार्थी ग्रामीण कृषि जागरूकता आणि ओद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत पीक पद्धती, आधुनिक शेती,पीक प्रात्यक्षिक, माती परीक्षण, पाणी व्यव्स्थापन, बाजारभाव, कीड व रोग व्यव्स्थापन आणि हवामान सल्ला या बाबत माहिती देणार आहेत
Dec. 13, 2024, 3:37 p.m.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालय, विळद घाट, येथील चौथ्या वर्षातील विद्यार्थी ग्रामीण कृषी जागरूकता व आद्योगिक कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
Dec. 13, 2024, 3:26 p.m.
डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यलय महाविद्यालय, विळद घाट येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे कृषी महाविद्यालय व डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाले.
Dec. 13, 2024, 3:22 p.m.
डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविदयालयात स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती भारतरत्न डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय कृषी शिक्षण दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर धोंडे हे उपस्थित होते.
Dec. 13, 2024, 3:22 p.m.
डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविदयालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागा अंतर्गत एड्स बद्दल जनजागृती व्हावी म्हणून डॉ. विखे पाटील कॉलेज व हॉस्पिटलचे डॉ. डी. एम. धावणे व डॉ. शुभदा अवचट यांचे व्याख्यान आयोजित केले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली सदरचा कार्यक्रम आयोजित केला होता.
Dec. 13, 2024, 3:20 p.m.
डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यलय, विळद घाट येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. सदरील कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली संविधान प्रास्ताविकेच्या वाचनाने संपन्न झाला.
Oct. 11, 2024, 3:42 p.m.
डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंऊडेशनच्या कृषी महाविदयालयामध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी 'दिक्षारंभ २०२४' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.साताप्पा खरबडे, सहयोगी अधिष्ठाता, पदव्युत्तर महाविद्यालय, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी,तर अध्यक्षस्थानी संस्थेचे सेक्रेटरी जनरल डॉ. पी.एम.गायकवाड, मा.उपसंचालक(तंत्र) प्रा.सुनील कल्हापुरे, प्राचार्य, डॉ.एम.बी.धोंडे, उपप्राचार्य डॉ. एस. बी.राऊत हे उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Oct. 11, 2024, 3:39 p.m.
डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंऊडेशनच्या कृषी महाविद्यालय, विळद घाट येथे रॅगिंगविरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. माणिक चौधरी उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी प्राचार्य,डॉ.एम.बी.धोंडे हे उपस्थित होते.
Aug. 20, 2024, 4:46 p.m.
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालय विळदघाट येथील सातव्या सत्राच्या विद्यार्थ्यांना ड्रोनद्वारे अत्याधुनिक पीक फवारणीचे प्रात्यक्षिक देण्यात आले . हे विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत राहुरी तालुक्यातील उंबरे येथे आलेले आहेत. उंबरे शिवारात कार्यरत असलेले स्वराज कृषी मित्र शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत विद्यार्थ्यांसाठी कपाशी पिकावर ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
Aug. 16, 2024, 12:27 p.m.
डॉ. विखे पाटील कृषी महाविद्यालया तर्फे ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम २०२४-२५ अंतर्गत उंबरे (ता. राहुरी) येथे शेतकरी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या शेतकरी चर्चासत्रात सोयाबीन बीजोत्पादन : उत्पनाचा स्रोत, दुध व दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती तंत्रज्ञान , आणि प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना या विषयांवर सविस्तर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
Aug. 16, 2024, 12:26 p.m.
डॉ. विखे पाटील कृषी महाविद्यालया तर्फे ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत ब्राम्हणीत शेतकरी मेळावा पार पडला . या वेळी प्रमुख व्याख्याते डॉ. नंदकुमार भुते, सहाय्यक किटक शास्ञज्ञ , मफुकृवि, राहुरी यांनी एकात्मिक कीड व्यस्थापन या विषयी मार्गदर्शन केलं. अजय गवळी यांनी जैविक शेतीचे महत्व सांगितले आणि वरिष्ठ किटक शास्ञज्ञ भाऊसाहेब पवार यांनी कपाशी पिकाचे व्यस्थापन व उत्पादन तंत्रज्ञान यावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मधुकर धोंडे म्हणाले कि, शेतकऱ्यांनी आधुनीक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन वाढवावे आणि रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे असे आव्हान केले.
Aug. 8, 2024, 1:46 p.m.
विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे कृषि महाविद्यालय व उत्तरप्रदेश येथील टेस्टबुक एज्यु सोल्यूशन प्रा. लि. यांच्या मध्ये विद्यार्थ्यांसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या मध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय, राज्यस्तरीय इ. विविध स्पर्धा स्पर्धा परीक्षांच्या तयारी साठी एक वर्ष मोफत ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे.
July 30, 2024, 4:38 p.m.
राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषिदुतांचे स्वागत करण्यात आले . सदर कृषिदुत , ग्रामीण कृषि जागरूकता आणि कृषि ओद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमासाठी ब्राम्हणी येथे आले आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत शेतातील मातीपरीक्षण , फळबाग व्यस्थापन, आदी विषयांवर ग्रामस्थांशी सवांद साधणार आहेत.
July 29, 2024, 4:35 p.m.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी संलग्न डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे कृषि महाविद्यालय, विळद घाट येथील कृषि दूतांकडून वृक्षारोपण करून कृषिदिन साजरा करण्यात आला.
July 29, 2024, 4:34 p.m.
ग्रामीण (कृषि) जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे कृषि महाविद्यालय , विळद घाट येथील कृषि दुतांनी कृषी दिनानिमित्त मौजे पिंप्री अवघड ता. राहुरी येथे शेतकऱ्यांना कृषिदिनाविषयी माहिती देऊन व वृक्ष लागवड करून कृषि दिन साजरा केला.
July 29, 2024, 4:31 p.m.
ग्रामीण (कृषि) जागरूकता आणि कृषिऔद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे कृषि महाविद्यालय , विळद घाट येथील कृषि दूतांकडून राहुरी खुर्द येथे कृषि दिनानिमित्त शेतकऱ्यांना कृषि विषयक माहिती देऊन वृक्ष लागवड करण्यात आली.
July 26, 2024, 4:51 p.m.
डॉ . विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे कृषि महाविदयालय वडगाव गुप्ता (विळद घाट ), अहमदनगर येथे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या कृषि व इतर संलग्न पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मोफत अर्ज भरण्यासाठी केंद्र सुरु करण्यात आल्याची माहिती . प्रा. सुनिल कल्हापुरे, उपसंचालक (तंत्र ) यांनी दिली आहे. अर्ज भरणे, करियर मार्गदर्शन या साठी महाविद्यालया मध्ये स्वतंत्र कक्ष सुरु असुन या सुविधेचा जास्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर धोंडे यांनी केले आहे.
July 10, 2024, 2:39 p.m.
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा वाढदिवस कृषी महाविद्यालयात वृक्षारोपणाने साजरा करण्यात आला. या वेळी परिसरात विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. प्राचार्य डॉ. एम. बी. धोंडे, उपप्राचार्य डॉ. एस. बी. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबविली.
March 20, 2024, 2:10 p.m.
डॉ . विठ्ठलराव विखे पाटील फौंऊडेशनच्या कृषी महाविद्यालयामध्ये 'कृषिरंग २०२४' वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले. या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून अर्चना पागिरे , तहसीलदार (महसुल ), महसूल विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक तर अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त ॲड . वसंतराव कापरे , संस्थेचे सेक्रेटरी जनरल डॉ. पी. एम. गायकवाड, उपसंचालक (तंत्र ) प्रा. सुनील कल्हापुरे, उपप्राचार्य डॉ. एस. बी.राऊत , विध्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. डी. एम. नलावडे हे उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी, विध्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.
March 19, 2024, 4:50 p.m.
शारदाबाई पवार महिला कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कृषी विकास ट्रस्ट, बारामती येथे संपन्न झालेल्या स्वयंसिद्धा युवती संमेलनामध्ये माझे विद्यालय , आमचा उत्कृष्ट उपक्रम या स्पर्धेत डॉ . विठ्ठलराव विखे पाटील फौंऊडेशनचे कृषी महाविदयालय , वडगाव गुप्ता (विळद घाट ), अहमदनगर येथे दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या कु. लटके रसिका बाळासाहेब यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या स्पर्धेत लटके रसिका यांनी '' क्लटीवेशन ऑफ ऑयस्टर मशरूम '' या उपक्रमाचे पॉवर पॉईंट च्या माध्यमातून सादरीकरण केले होते.
March 14, 2024, 10:47 a.m.
ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषीदुतांनी रेखाटला गावचा नकाशा -कृषीदुतानी गावातील लोकांचा समाचा जाणून घेतला व त्यावर उपाययोजनाबद्ल लोकांना माहिती व मार्गदर्शन केले.
March 13, 2024, 2:03 p.m.
ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालय, विळदघाट येथील कृषिदुतांनी वाकोडी गावामध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून लाभलेल्या कृषि सहाय्यक मा. सौ. मंदा भारती, महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. डी.पी. मावळे व प्राध्यापिका एस. ए. मेघडंबर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. धोंडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शेतकऱ्यांना क्षारयुक्त जमिनीचे व्यवस्थापन व गोड्या पाण्याच्या विविध स्रोत याविषयी माहिती दिली.
March 13, 2024, 1:57 p.m.
कृषीदूतांद्वारे खंडाळा येथे वृक्षारोपण
March 13, 2024, 12:02 p.m.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर, विळद घाट मधील कृषीकन्यांद्वारे अरणगाव येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक कृषी अधिकारी सौ. मंदा भारती यांनी कृषी विषयक योजना तसेच महाविद्यालयातील उद्यानविद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. एस.पी.खेडकर यांनी फळबाग व्यवस्थापन यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
March 13, 2024, 10:42 a.m.
खंडाळा - ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित कृषी महाविद्यालय विळदघाट येथील कृषीदूतांनी खंडाळा गावामध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले . या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले कृषी सहाय्यक मा.श्री. उमेश शेळके साहेब व प्रा.डॉ. डी.एम. नलवडे सर(पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग प्रमुख) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .
March 13, 2024, 10:16 a.m.
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि महाविद्यालयातर्फे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत खडकी गावात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख व्याख्याते डॉ.सूरज खेडकर(उद्यानविद्या विभाग) व सुरेश सौदागर (ग्रामसेवक) यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ.सूरज खेडकर यांनी फळबाग लागवड व कीड,खत,तण व्यवस्थापन तसेच जैविक खतांच्या वापरामुळे उत्पादनात होणारी वाढ बाबत मार्गदर्शन केले.त्याचबरोबर सुरेश सौदागर यांनी हवामानातील बदल आणि त्याचा पिकांवर होणारा परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य डॉ. एम. बी. धोंडे, डॉ.वी.एस.निकम, कार्यक्रम अधिकारी प्रा.के.एस.दांगडे,सरपंच प्रविण कोठूळे, उपसरपंच सौ.सुरेखा गायकवाड तसेच ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.
Oct. 9, 2023, 12:12 p.m.
विळद घाट येथील डॉ.विखे पाटील कृषि महाविद्यालयातर्फे ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत देहरे गावात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्याख्याते डॉ.दत्तात्रय वने, प्राचार्य डॉ.एम.बी.धोंडे, सरपंच सौ.नंदा काळे, उपसरपंच दिपक जाधव, कृषि पर्यवेक्षक विजय सोमवंशी, सहाय्यक सौ.कविता मदने, संजय शिंदे, कार्यक्रम अधिकारी प्रा.किरण दांगडे, ग्रा.पं.सदस्य महेश काळे, सोसायटीचे चेअरमन अर्जुन काळे, प्रगतीशिल शेतकरी वैभव काळे, नाना लांडगे आदि उपस्थित होते.
Oct. 9, 2023, 11:57 a.m.
Oct. 9, 2023, 11:13 a.m.
विद्यार्थ्यानी ध्येय निश्चित करुन कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चित मिळत असते. शिक्षक हे आपले जीवन घडविणारे खरे मार्गदर्शक आहे. त्यामुळे त्यांचा नेहमीच आदर केला पाहिजे. तुमचे स्वागत सिनिअर विद्यार्थी करत आहेत, ही आनंददायी बाब आहे. कारण गेल्या काही वर्षांत रॅगिंगचे प्रकार वाढले असतांना विखे पाटील कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांमधील नाते दृढ करणारा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांनी आपआपसात स्नेहभाव ठेवून शिक्षण घ्यावे. आजही ही मैत्री जीवनात अनेकवेळा उपयोगी पडत असते. कॉलेजचे जीवन हे भारावून टाकणारे असेच असते. याचा आनंद घ्या, असे प्रतिपादन कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक गजेंद्र इंगळे यांनी केले.
Oct. 9, 2023, 10:58 a.m.
June 19, 2023, 2:22 p.m.
May 27, 2023, 2:21 p.m.
विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे कृषी महाविद्यालयात ‘कृषी गाथा 2023’ वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात विविध स्पर्धेतील विजेत्या संघांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक, बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
May 27, 2023, 2:14 p.m.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांनी नुकतेच विद्यापीठाच्या तीन सदस्सीय समितीद्वारे केंद्राचे मुल्यांकन केले होते. या समितीने महाविद्यालयात असणार्या भौतीक सुविधा, सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्षेत्र भेटीसाठी आवश्यक असलेली जमिन, शेडनेट, कृषि शिक्षण केंद्र व्यवस्थापन, मॅन्युअल, प्रशासकीय बाबी, वित्तीय बाबी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी शैक्षणिक बाबी यांची तपासणी करून महाविद्यालयाच्या कृषि शिक्षण केंद्रास ’अ’ दर्जा दिलेला आहे.