डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन्स कृषी महाविद्यालय , वडगाव गुप्ता (विळद घाट) अहमदनगर यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मधील राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबीर दि. २५ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत टाकळी काझी ता. जि . अहमदनगर येथे पार पडले. सदर कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. महाविरसिंग चौहान ,विध्यार्थी कल्याण अधिकारी तथा संचालक, रा. से. यो. , मफकृवि, राहुरी., प्रा. डॉ. विलास आवारी, क्रिडा अधिकारी, मफकृवि, राहुरी., डॉ. गोकुळदास गायकवाड, ई. टी. आय., संचालक, अहमदनगर, तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एम. बी. धोंडे, प्राचार्य, कृषी महाविद्यालय, विळद घाट, अहमदनगर हे होते. तसेच समारोप समारंभा साठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अशोकराव ढगे, वरिष्ठ कृषी शास्रज्ञ, मफकृवि, राहुरी हे उपस्थित होते . या शिबीर मध्ये स्वच्छ भारत अभियान, डिजिटल साक्षरता अभियान, नसमुक्ती अभियान, एड्स जागृती अभियान, योग आणि ध्यान, सामाजिक विषयातील सांस्कृतिक उपक्रम, नेतृत्व विकास, बाल संगोपन आणि शिक्षण असे वेग वेगळे उपक्रम राबवण्यात आले होते. हे शिबीर पार पाडण्यासाठी सर्व ग्रामस्थ , राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.